*कार्यकारी --संपादक*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:--8378081147*
नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरात मकर संक्रांती निमित्त महिलांनी पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू, तिळगुळ आदि साहित्याने एकमेकींनी ओवसले. मकर संक्रांती व षटतिला एकादशी निमित्त दुपारी तीन ते सुर्यास्तापर्यत ओवसण्यास गर्दी झाली होती.
श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे पुरातण हेमाडपंथी काळातील प्रसिद्ध देवस्थान या भागाचे कुलदैवत आहे. मकर संक्राती निमित्त पुणे, सोलापूर जिल्ह्यातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून एकमेकींना हळदी कुंकवाच्या मानासह ओवश्याचे साहित्य एकमेकींना देवून अलिंगण दिले.
संक्रांतीचा सण सामाजिक ऐक्य व नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत तिळगुळ वाटप, शुभेच्छांची देवाण घेवाण केली. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या म्हणीप्रमाणे आपुलकी आणि स्नेह व्यक्त करण्यात आला.
संक्रांतीनिमीत्त मोठी यात्रा भरते यामध्ये पाळणे, मोठे झोके, झुकझूक गाडी, मेवा मिठाई, महिलांचे सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांच्या खेळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आल्याने यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. यात्रेत खरेदीसाठी महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. इंदापूर आगाराची असणारी एकमेव एसटी बस आज बंदच ठेवण्यात आल्याने भाविकांची व महिलांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे खाजगी वाहनांनी प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
नरसिंहपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके व त्यांचे सर्व पोलीस स्टाॅप यांनी मंदिर परिसरामध्ये चोक बंदोबस्त ठेवला होता. तसेच मंदिरात गौरव दंडवते(पुजारी), प्रसाद दंडवते (मुख्य पुजारी), अविनाश दंडवते (व्यवस्थापक) तसेच सरपंच अर्चना नितीन सरवदे, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्थांनी यात्रेचे योग्य नियोजन केले होते.
फोटो : श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात मकर संक्रातीनिमित्त दर्शनासाठी महिलांची गर्दी केली होती.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा