*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत पंढरपूरच्या रविराज चव्हाणने करमाळ्याच्या जय पाटीलचा सहा तीन गुणाने पराभव करीत त्रिमूर्ती केसरी चषकाचा मानकरी ठरला.त्यास प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम रुपये दोन लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले. उपविजेता जय पाटील यास द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये दीड लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले.
निमगाव (के.) येथील सागर देवकाते यांनी तृतीय क्रमांकाचे रोख रुपये एक लाख व माळशिरसचा आर्यन पाटील यांनी चतुर्थ क्रमांकाचे पन्नास हजार रुपये व सन्मान चिन्ह पटकावले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने शंकरनगरच्या शिवतीर्थ आखाड्यात ४७ व्या अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा व वजन गटाच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या.जयंती समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर स्पर्धेचे आयोजन केले होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,संस्थापक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील,आ.रणजीतसिंह मोहिते पाटील,खा.धैर्यशील मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील,स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील,आ.अभिजीत पाटील,माजी आ.लक्ष्मणराव ढोबळे, जयवंत जगताप,भगीरथ भालके, डॉ.अनिकेत देशमुख,वसंत देशमुख, भारत शिंदे,राष्ट्रीय पंच राम सारंग, मल्ल सम्राट रावसाहेब मगर,महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर,व्हा.चेअरमन शंकरराव माने देशमुख,वसंत जाधव यांच्यासह विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, मल्ल,कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतिम अटीतटीच्या स्पर्धेत रविराज चव्हाण व जय पाटील यांनी पहिल्या वीस मिनिटात एकमेकाची ताकद आजमावली.त्यानंतर सहा मिनिटाची गुणावरती कुस्ती लावण्यात आली.यामध्ये चपळाईने रविराज चव्हाण यांने ६ गुण मिळवीत विजय प्राप्त केला तर जय पाटील याने २ गुण मिळवले.युवराज केचे व सुकुमार माळी यांनी सूत्रसंचालन केले.स्वागत पोपट भोसले पाटील यांनी केले आभार बिभिषन जाधव यांनी मानले.
या स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे
विविध वजनी गटातील विजेते :-
२५ किलो आदर्श चव्हाण (खुडूस) ,२८ किलो अर्णव भुसारे (दिघंची), ३०कि.करण गायकवाड (खुडूस), ३२ कि. करण नरके(खुडूस), ३५ कि.मेघराज तांबिले(अकलूज), ४०कि. संस्कार जाधव(खुडूस),४५ कि सुधीर खवळे(माळशिरस),५० कि. यशराज मोरे (खुडूस),५५ कि. सौरभ नरुटे(खुडूस),६० कि. विशाल सुरवसे (खुडूस),६५ कि. अविराज माने (खुडूस),७० कि. रणजित गोरड (म्हसवड),७५ कि. सोमनाथ गोरड (म्हसवड),८० कि. राहुल कोरडे (मायणी),८५ कि. प्रकाश कोळेकर (सदाशिवनगर)
या स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रकूल स्पर्धेचे विजेते, राष्ट्रीय कुस्तीचे पंच राम सारंग यांचेसह नितीन शिंदे, अनिल बाबर,चंद्रकांत मोहोळ,तानाजी केसरे,वैभव तेली, महेश पाटील,गोरख पाटील,महेश जाधव,माणिक पाटील,बाजीराव पाटील,प्रवीण निकम अकलूज येथील विराज निंबाळकर,भोजराज माने,बाजीराव सरगर,गणेश शिंदे, अशोक शिंदे,काका जगदाळे यांनी काम पहिले.या सर्वांचा स्पर्धा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा