*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण येथील भारत माता इंग्लिश स्कूलमध्ये पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम व पालक मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामुळे शाळा-पालक नाते अधिक दृढ झाले असून संपूर्ण परिसरात उत्सवाची चाहूल पसरली होती.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. उपस्थित महिलांचे हळदी-कुंकू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली
पालक मेळाव्यात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. पालकांनीही आपल्या सूचना व मत मांडत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता शाळा आणि पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षकवृंद व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. भारत माता प्रायमरी स्कूलच्या संचालिका सौ राजश्री खिचडे व संचालक प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती गिराम अश्विनी खिचडे साक्षी समुद्रे सुचिता पाटील उषा पालकर शिंदे मॅडम मुख्याध्यापक महेश समुद्रे व शितल नाईकवाडे रामेश्वर खिचडे उत्तरेश्वर खिचडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुचिता यादव यांनी केले या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा