*संपादक --हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
धाराशिव शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये प्रभाग क्रमांक २ मधील विकास नगर तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील शाहू नगर येथील रस्त्याच्या कामांचा समावेश होता.
शहरातील खराब व जीर्ण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने नगरोत्थान योजनेतून तब्बल ११७ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून, या निधीतून धाराशिव शहरातील ५९ रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आली. नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी नियुक्त होताच विकासकामांना आता वेग आला आहे.
विकास नगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले असून काकडे प्लॉट भारत गॅस गोडाऊन परिसरातील रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सोबत घेऊन कामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. कामाचा दर्जा उच्च दर्जाचा राखावा, कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत यासाठी स्पष्ट टाईमलाईन निश्चित करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या. तसेच ज्या भागात ही कामे सुरू आहेत त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची देखरेख समिती स्थापन करून नियमित सूचना व निरीक्षण करण्याचे निर्देश दिले
नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची धूळ, चिखल व खड्डेमय रस्त्यांमधून कायमची सुटका होणार असून, वाहनधारकांसह सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे, उपनगराध्यक्ष श्री. अक्षय ढोबळे, श्री. राहुल काकडे, श्री. आकाश तावडे, श्री. अभिजित काकडे, श्री. अमोल राजेनिंबाळकर, सौ. अलका प्रकाश पारवे, सौ. राणीताई दाजी पवार, श्री. सुजित साळुंके, श्री. दाजी पवार, श्री. पंकज जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
#धाराशिव #नगरोत्थान_योजना #शहरविकास #रस्तेविकास #विकासकामे #नगरपरिषद





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा