ज्येष्ठ पत्रकार
संजय लोहोकरे
टणू (ता.इंदापूर) येथील प्रताप पोपट मोहिते हे इंदापूर येथील एस.बी. पाटील वनगळी इंजिनीअरिंग काॅलेजमध्ये लॅब ॲसिस्टंट या पदावर कार्यरत होते.त्यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते शांत व संयमी स्वभाव म्हणून सर्वत्र परिचित होते.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांनी संस्थेसाठी केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल अंकिता पाटील ठाकरे व संस्था यांनी मोहिते परिवाराला महाविद्यालयाच्या वतीने आर्थिक मदत व सहकार्य केली आहे.
माजी मंत्री तथा एस.बी.पाटील इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी कै.प्रताप मोहिते यांच्या निधनाबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थी व स्टाफ यांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार आज जमा झालेली ४,३०,०००/- रूपयांची मदत देण्यासाठी व मोहिते परिवाराचे सांत्वन करण्यासाठी अंकीता पाटील ठाकरे या टणू येथे मोहिते परिवारात आल्या होत्या.संस्थेच्या वतीने देण्यात आलेली छोटीशी मदत त्यांच्या परिवार कडे स्वाधीन करण्यात आली. कै.प्रताप मोहिते यांच्या पश्च्यात पत्नी तनुजा पाटील या यशवंतनगर (शंकरनगर) येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत व त्यांना दोन मुले असा परिवार आहे.मोठा मुलगा चि.अमरदीप प्रताप मोहिते हा इयत्ता ९ वीत तर दुसरा मुलगा चि.अशितोष प्रताप मोहिते हा इयत्ता ७ वीत शंकरनगर (ता.माळशिरस) येथील महर्षी प्रशाला शिक्षण घेत आहेत.
*चौकट*
आमच्या संस्थेतील सहकारी व कर्मचारी प्रताप मोहिते यांच्या परिवारावर अचानक दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.कधी ही भरून न निघणारे हे दु:ख आहे. त्यांच्या परिवाराला आपल्या संस्थेच्या वतीने आर्थिक सहकार्य व मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.पाटील परिवार त्यांच्या दु:खात सहभागी असून प्रताप मोहिते यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वपरी सहकार्य व मदत करणार आहे.
*अंकिता पाटील ठाकरे*
बावडा ता.इंदापूर जि.पुणे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा