*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*अलीम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक यांचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी भाऊ गर्दी केली असून सोशल मीडिया फ्लेक्स, बॅनर, तसेच गुप्त बैठका प्रत्यक्ष भेटीगाठी घेत मदतीला येणारा धावून संकटकाळी मदत करणारा अभ्यासू कार्यकर्ता, आपला माणूस, उगवते नेतृत्व, कामाचा माणूस, हक्काचा माणूस, युवा नेतृत्व अशी नानाविध लावलेले असंख्य कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी भाऊ गर्दी केली आहे हेच कार्यकर्ते आता मतदाराच्या गर्दीत बघायला मिळत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक या आधीच होणे अपेक्षित होते परंतु विविध कारणाने या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांनी आधीच तयारी केली काही झाले तर निवडणूक लढवायची असाच थांब निश्चय अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केला असून यामुळे पक्षाच्या कोर कमिटी मधील वरिष्ठ नेते मंडळींना तिकीट वाटप करताना मोठी कसरत करावी लागणार अनेक कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती गण मधील आपापल्या भागात विविध नेतेमंडळी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटी गाठीला सुरुवात करीत निवडून आल्यानंतर आपण आपल्या भागाचा असा विकास करून हे मतदारांना पटवून देत आहेत यावेळेस युवा इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे एकंदरीतच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची धावपळ वाढली असून युवा व नवीन चेहऱ्याचे आहेत की आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला एक संधी द्या अशी भावनिक साध मतदारांना घालीत आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य काही नवे इच्छुक सार्वत्रिक ठिकाणी हजेरी लावताना बघायला मिळत आहे काहीजण वाढदिवसाचे सोहळे साजरे करत आहेत एकंदरीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे
एकंदरीत पाहता करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक प्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखवीत काही इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याचे पहावयास मिळत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा