*अकलूज ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर गट नंबर दोन येथील डॉ.अविनाश जाधव आणि डॉ. निसर्ग जाधव यांच्या रुक्मिणी हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत मधुमेह तपासणी शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिरात २५२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
एच.व्ही.देसाई नेत्र हॉस्पिटल महम्मदवाडी पुणे,रोटरी क्लब अकलूज व रुक्मिणी हॉस्पिटल, माळीनगर गट नंबर दोन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.संजय सिद्ध यांच्या हस्ते तसेच माळशिरस तालुका निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमोल माने-शेंडगे व माळशिरस तालुका होमिओपॅथीक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे-भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.या शिबिरास कारखान्याचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप जाधव, संचालक निळकंठ भोंगळे, माजी संचालक सुनील बोरावके, शुगरकेन सोसायटीचे संचालक कुणाल इनामके, संचालिका अलका बोरावके,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, संचालक रत्नदीप बोरावके,संचालक दिलीप इनामके, ज्येष्ठ सभासद दिलीप कुदळे, तांबवे ग्रा.पं. सदस्य सारंग भोंगळे,संचालक डॉ. अभिजीत मगर, रो.अजित वीर, रो.दिपक फडे, सीए नितीन कुदळे, ॲड.प्रवीण कारंडे,रो. जयदीप बोरावके, रो.राजीव बनकर, रो. तेजस्विनी बोरावके तसेच रोटरी कम्युनिटी कॉर्प्सचे अध्यक्ष घनश्याम जाधव,सदस्य रोहित गिरमे यांनी उपस्थिती लावली होती.
या शिबिरात २५२ लाभार्थ्यांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला, त्यापैकी ६५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. तसेच १९० लाभार्थ्यांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ.अमोल माने-शेंडगे बोलताना म्हणाले,मोतीबिंदू हा हळूहळू वाढणारा आजार असून वेळेवर शस्त्रक्रिया न झाल्यास दृष्टी कमी होत जाते, दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आणि अंधत्वाचाही धोका संभवतो. योग्य वेळी केलेली मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही सुरक्षित, सोपी आणि दृष्टी पुन्हा उजळवणारी जीवनबदल घडवणारी प्रक्रिया आहे. आज अनेक कुटुंबांना स्पष्ट दृष्टीचे वरदान मिळण्याची आशा या शिबिरातून निर्माण झाली आहे.
प्रास्ताविकात रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.केतन बोरावके म्हणाले की,दृष्टी उजळवणारा समाज उपयोगी असा उपक्रम रोटरी क्लबच्या वतीने राबविला जात असून आरोग्य शिबिरांमुळे केवळ आजाराचे निदान होत नाही, तर वेळेवर उपचारांची जाणीव निर्माण होऊन अनेकांचे आयुष्य उजळते.आणि रुग्णांना उपचाराची योग्य वेळेत दिशा मिळते.
या उपक्रमासाठी रुक्मिणी हॉस्पिटलचे
डॉ.अविनाश जाधव आणि डॉ. निसर्ग जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख कल्पेश पांढरे, एच. व्ही.देसाई नेत्र हॉस्पिटलचे डॉ.आशिष चौधरी,डॉ.सलीम तांबोळी, सागर कोळेकर, सुभाष सोरटे,राजन राऊत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.कल्पेश पांढरे यांनी केले तर आभार रो.अजिंक्य जाधव यांनी मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा