*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
संग्रामनगर येथील "करे योग रहे निरोग " या महिला ग्रुपच्या वतीने पर्यावरण पूरक व प्लाॅस्टिक मुक्त हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी योगा ग्रुप वर्गातील ६० महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात सर्व वयाच्या महिलांनी उखाणे घेवून गाणी म्हणून आनंदात संक्रांत सण साजरा केला.
मोत्याची माळ सोन्याचा साज रावाचे नाव घेते संक्रांत आहे आज.असे एकापेक्षा एक उखाणे घेवून कार्यक्रमात रंगत आणली. आजचा हळदी कुंकुंचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देशून पर्यावरणाची जपवणूक करा.हा संदेश दिला होता. त्यासाठी प्लाॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी बटवे वाटण्यात आल्या. काॅफीसाठी काचेच कप वापरले. सुवासिनी यांना वाणामध्ये गुळ स्टील प्लेट तिळाचे लाडू देवून ह्या कार्यक्रमाला रंगत आली.सौ. सुजलाताई ताम्हाणे यांच्या बागेत निसर्गरम्य वातावरणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यांनी दिलेली काॅफी तिळाचा लाडू व सौ.जगदेवी कोरे यांचे वडा पाव दिल्याने महिलांना उखाणे म्हणण्यास जोर धरला होता.
*चौकट..*
सध्या सर्वत्र प्लाॅस्टिकच्या अति वापर सुरू असल्यामुळे निर्सगातील पर्यावरणाचा -हास लागला आहे. त्यामुळे आम्ही यावर्षीची संक्रांतीच्या सणासाठी पर्यावरण पूरक वस्तूंचे वाण म्हणून महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या.या कार्यक्रमा मुळे महिलांना पर्यावरणाचे महत्त्व समजले.
*सौ.अंजली कुलकर्णी संचालक*
करे योग रहे निरोग ग्रुप संग्रामनगर





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा