*सहसंपादक-- डॉ.संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो :-9922419159*
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदीप गारटकर हे शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप नेते राजेश पांडे, आमदार राहुल कुल व प्रवीण माने यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्री.
गारटकर यांचा प्रवेश होणार आहे.
प्रदीप गारटकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पतित पावन संघटनेच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले. सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा भाजपकडून शिवसेनेला सोडण्यात आल्यानंतर ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता मात्र त्यांनी तब्बल ७५ हजार मते मिळवून प्रभावी ताकद दाखवून दिली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील श्री. गारटकर यांचा प्रदीर्घ अनुभव असून सन १९९२ ते १९९७ या कालावधीत त्यांनी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. सलग दहा वर्षे नगरपालिकेवर स्वतःची सत्ता कायम ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
सन २००५ ते २०२५ या कालखंडात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश प्रवक्ते, सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक आदी विविध पदांवर काम करत अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिले.
मात्र सन २०२५ मध्ये पक्षातील नेतृत्वाशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. त्यांना १२७ मतांनी पराभव पत्करावा लागला. ते एक अभ्यासू नेते तसेच कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. त्या
पार्श्वभूमीवर आता प्रदीप गारटकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होत असून, त्यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा