*अकलूज ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
रस्तासुरक्षा अभियाना दरम्यान रस्ता सुरक्षा नियमाबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाठी अकलूज उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दोन रस्ता सुरक्षा चित्ररथ तयार करण्यात आले आहेत.उप -प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून जे रस्ता सुरक्षा नियम रस्त्यावर अपघात निश्चितपणे कमी करू शकतात अशा सात नियमांची "प्राणरक्षक सप्तसुत्री" या चित्ररथावर साकारण्यात आलेली आहे.या सात रस्ता सुरक्षा नियमांचे जरी पालन रस्त्यावर प्रत्येक वाहन चालकाने केले तरी रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर घट होईल.या हेतूने या चित्ररथाची योजना करण्यात आली आहे.ध्वनीक्षेपकाद्वारे ही सप्तसुत्री चित्ररथातून उद्घोषित केली जाईल. या व्यतिरिक्त राह-वीर योजनेची माहिती चित्राच्या स्वरूपात या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यांमध्ये ज्या रस्त्यावर, ज्या ठिकाणी जास्त रस्ते अपघात होतात.अशा गावांमध्ये जाऊन रस्ता सुरक्षा माहितीचा प्रसार हे चित्ररथ करतील.उप -प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे व मोटार वाहन निरीक्षक वैभव राऊत यांनी या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रस्तासुरक्षा प्रसार अभियानास शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक मोटर वाहन निरीक्षक अश्विनी जगताप व कार्यालयातील अभ्यागत,चालक- मालक प्रतिनिधी संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा