*कार्यकारी --संपादक*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:--8378081147
लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीने लातूर महानगरपालिका 70 पैकी 47 जागा जिंकून निर्विवाद प्राप्त केले त्याबाबत आमदार अमित देशमुख यांनी लातूरकर मतदारा प्रती कृतज्ञता व्यक्त करत मतदारांचे आभार मानले ते त्यांच्याच शब्दात वाचा
लातूर महानगरपालीका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीने ७० पैकी तब्बल ४७ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे, या सर्व विजयाचे श्रेय लातूरकरांचे आहे त्यामुळे मी सर्व लातूरकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. लातूरकरांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वजण कायम प्रयत्नशील राहणाार आहोत. या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन तर करतो आहेच सोबतच ज्या उमेदवारांनी ही निवडणूक जिद्दीने लढवली परंतु त्यांना यश मिळाले नाही त्यांचेही अभिनंदन करून त्यांना आगामी काळात नक्कीच सामाजिक कार्य करण्याची योग्य जबाबदारी मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आहे.
लातूरची जनता शांत, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख असल्याचे या निकालातून पून्हा एकदा सिध्द झाले आहे. महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि इतर घटक पक्षाच्या मंडळीनी इतर शहराप्रमाणे लातूरमध्ये येवून वादग्रस्त वकतव्य केली, अफवा पसरवून समाजासमाजात द्वेष पसरवून फुट पाडण्याचे प्रयत्न केले. येथील जनतेने हे सर्व प्रयत्न उधळून लावल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लातूर हे विविधतेने नटललेले, सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वंचित बहूजन आघाडी सोबत शहराच्या या वैशिष्टयाला अनुरुप ठरणारी आघाडी केली. ही आघाडी लातूरकरांना मनपासुन पसंद पडल्याचेही या निकालातून स्पष्ट झाले आहे.
आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब या नेत्यांनी लातूरचे हे वेगळेपण जोपासत विकास प्रक्रीयेला गती दिली आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ते काम पूढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे असतांना येथील आदरणीय नेत्याच्या आठवणी पूसण्याचे वक्तव्य करण्याचे धाडस भाजपच्या नेते मंडळींनी या निवडणुकीदरम्यान केले . त्यांनाही लातूरच्या जनतेने या निकालातून योग्य संदेश दिला आहे.
लातूर हे मराठवाडयात अत्यंत गतीमान पध्दतीने विकसीत होत असलेले शहर आहे. या विकास प्रक्रीयेला बळकटी देणारा जनतेच्या सुचना घेवून तयार केलेला पंचसुत्री जाहीरनामा काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीने या निवडणुकीत जनतेसमोर ठेवला. जनतेकडून या जाहीरनामाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या जाहीरनाम्याची कालबध्द अमंलबजावणी करण्याचे आम्ही ठरवले आहे.
लातूर महानगरपालीका निवडणुकी दरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लीकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी भक्कम पाठबळ दिले, वंचित बहूजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय दिलीपराव देशमुख, खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार जिल्हा बॅकेचे चेअरमन धिरज देशमुख, वंचित बहूजन आघाडीचे युवा नेतेचे सुजात आंबेडकर, प्रदेश सचिव मुफती वसीम सय्यद, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जिंतेद्र देहाडे, भाऊसाहेब आजबे, स्टार प्रचारक हनुमंत पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रचार सभा घेतल्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडडेटीवार, माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन करुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले. स्थानीक काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अहोरात्र परिश्रम केले या सर्वांसोबतच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडी उमेदवारांना सहकार्य केले, त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.
#लातूर #महानगरपालिका #निवडणूक #काँग्रेस
#वंचित_बहुजन_विकास_आघाडी.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा