Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

फिनिक्स स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी .

 उपसंपादक- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 25/4 लवंग मध्ये थोर समाजसुधारिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  फिनिक्स स्कूल पालक संघ महिला अध्यक्षा निकिता मोरे प्रमुख पाहुणे सीताराम शेंडगे ,रणजित चव्हाण  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.



यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत येवून शाळेत हजेरी लावली.या प्रसंगी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी  स्त्रीशिक्षण, सामाजिक समता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना देत सावित्रीमाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान अधोरेखित केले, “आजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईंच्या विचारांवर चालत ज्ञान, समानता व माणुसकी जपली पाहिजे,” असे प्रतिपादन केले.



कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद गुलशन शेख ,तमन्ना शेख व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजप्रबोधनाची जाणीव निर्माण झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा