Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

*अकलुज जि. प. प्राथमिक शाळा मुली नं. 3 येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन साजरा*

 *अकलूज प्रतिनिधी*

*एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



"सोसूनी अनंत यातना शिकवलेस  तू स्त्रियांना, धन्य होतो आम्ही तुझी थोरवी गाताना."

 आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिका दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर 3 अकलूज येथे बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

 याप्रसंगी प्रथम प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये लेक वाचवा लेक शिकवा, मुलींना शाळेत पाठवा, आपली घरे स्वच्छ ठेवा, मुलगी शिकली प्रगती झाली. यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुले नंबर दोनच्या मुख्याध्यापिका अंगुले मॅडम  यांनी केले.



 व्यासपीठावर छोट्या सावित्री विराजमान झाल्या होत्या. अक्षरा गायकवाड हिने सावित्रीबाई फुले त्यांच्या जीवनावर आधारित ओवी सादर केली. मुलींनी त्यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. कोरबू मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार मांडले व बेटी हू मै बेटी या गीताचे सुंदर असे गायन केले. बळवंतराव मॅडम यांनी देखील आपले विचार मांडले सावित्री झालेल्या सुजाताने मी सावित्री बोलते म्हणून आपले विचार मांडले.  या कार्यक्रमासाठी फलक लेखन श्री समीर कोरबू सर व करीना मॅडम यांनी केले. लिंबू चमचा रांगोळी स्पर्धा व या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहिते सर यांनी केले. आभार सौ कोळी मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मुली नंबर 3 चे मुख्याध्यापक श्री कोरे सर,श्री नागणे सर,श्री मोहिते सर,कोरबू सर, कोळी मॅडम,कोरबू मॅडम  जाधव मॅडम, अंगुले मॅडम राऊत सर शेख सर गायकवाड सर अडाणे मॅडम बांगी मॅडम बळवंतराव मॅडम या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा