Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

*!!! शिवसेनेच्या धनुष्यबाणाने घेतला कमळाचा वेध एकाच बाणात चार पाकळ्या बाहेर तीन पाकळ्या आत !!!*

 *अविनाश देशमुख शेवगांव*       

     9960051755 

/9270442511*



*!!! भाजप गटाला बाजूला ठेवत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र येत सिराजभाई पटेल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड !!!*

दिनांक 15 जानेवारी 2025 वार गुरुवार ~

आज शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.माया अरुण मुंढे व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.विजया घाडगे मॅडम यांच्या  उपस्थितीत उप-नगराध्यक्ष पदाची निवड यशस्वीरीत्या पार पडली. भाजप गटाला बाजूला ठेवत शिवसेना (शिंदे गट), 03 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) 04 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) 10 हे तिन्ही पक्ष एकत्र येत एकमताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिराजोद्दीन पटेल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अनुभवातून व कार्यतत्परतेतून शेवगाव शहराच्या विकासाला निश्चितच दिशा मिळेल,असा विश्वास यावेळी शिवसेनेचे राज्याचे नेते अरुण मुंढे यांनी आभार व्यक्त केला. तसेच या निवडणुकीदरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे श्री. अजिंक्य लांडे यांची बिनविरोध निवड झाली तर शिवसेनेकडे कोणतेही संख्याबळ नसताना चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रियेतून शिवसेनेचे श्री.साईनाथ आधाट यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली. भा.ज.प. कडून कट्टर आ. समर्थक मोनिकाताई राजळे यांचे कट्टर समर्थक गणेश कोरडे यांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रभावी कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी व अरुण मुंढे यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शहरातील नागरिक तसेच पत्रकार बांधव याठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते.

*ताजा कलम*

*जे स्वतःला आतापर्यंत शेवगांव शहराचे  अनभिषिक्त सम्राट समजत होते. शेवगांवच्या  राजकारणात कायम शेवटची धोबी पछाड देण्याचे काम करणारे अनेक मातबबर नेते आज तहसील कार्यालयात शेवटच्या  अर्ध्या तासात झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे अवाक झाले. एरवी पोरासोरांची पार्टी म्हणून हिणवल्या गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या बीनिच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीच्या श्री चंद्रशेखर घुले पाटील आणि डॉ. क्षितिज घुले पा. यांच्याबरोबर संधान साधुन गल्ली ते दिल्ली सत्ता असलेल्या मुरब्बी  भाजपाला अलगद सत्तेबाहेर ठेवले* 

*विशेष बाब*

*शेवगांव शहर भा.ज.प.चे  शहरातील गटा तटाचे आणि खालच्या पातळीवरचे आरोप प्रत्यारोप आणि व्यक्तिगत चिखलफेक उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी आणि शेवगावकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिली त्यांचे इतर पक्षातील छुपे मित्र सुद्धा घायाळ झाले* 

*क्रमशः*

*आभार प्रदर्शनात श्री अरुण मुंढे यांनी "मी शेवगांवकर" चे  पत्रकार अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलेल्या अचूक अंदाजाचे खास शैलीत कौतुक केले...* 

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा