*कार्यकारी --संपादक*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:--8378081147*
- बारामती येथील भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेलसमोर केवळ वाहन पार्किंगच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी तन्मेष सुधीर साळुंखे याला अखेर पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दि.२९ नोव्हेंबर रोजी मानस दीपक पाटील (रा.तानाई नगर, बारामती) हे आपल्या मित्रांसह जेवणासाठी वृंदावन हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलच्या बाहेर वाहन पार्किंगवरून वाद झाला. या वादातून आरोपी तन्मेष साळुंखे, राम लोखंडे, माउली रणदिवे, ओंकार भोसले व त्यांच्या ११ ते १२ साथीदारांनी मानस पाटील यांच्यावर दगड व लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनाही पिकअप मध्ये येऊन बेदम मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपी राम अनिल लोखंडे (वय २४) याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे याला दि.१३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी टीम पो.उपनि. युवराज पाटील, हवालदार मनोज पवार, सागर देशमाने, भारती खंडागळे, पोलीस अंमलदार राजू बन्ने व दादा दराडे सहभागी होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.
चौकट:
बारामती तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.'




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा