*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील पत्रकार , टीव्ही नाईन चे प्रतिनिधी शितल कुमार मोटे यांना करमाळा येथील पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांच्या केबिनमध्ये मोठे यांच्यावर आरोप करीत एक प्रकारे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे
याबाबतची माहिती अशी की आज करमाळा पोलीस स्टेशन कार्यालयाच्या आवारात लव्हे तालुका करमाळा येथील उर्मिला कोंडलकर हे आपल्या तक्रारीची दखल घेत नसल्याबाबत उपोषणाला बसल्या होत्या सौ कुंडलकर यांचे चार तोळे सोने चोरीला जाऊन तब्बल सहा महिने झाले होते यांचे वार्तांकन करण्यासाठी व पोलीस स्टेशनच्या कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी श्री मोठे हे पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन त्यांनी सदर बातमी आपल्या टीव्ही नाईन च्या माध्यमातून व्हायरल केली होती याचा राग मनात धरून करमाळा येथील पोलीस निरीक्षक श्री माने यांनी मोटे यांना आपणच उपोषणकर्त्यांना उपोषणासाठी बसवले आहे असा थेट आरोप करीत पत्रकारांची एक प्रकारे नाचक्की तसेच पत्रकाराचा अवमान केला
आहे याबाबत पोलीस निरीक्षक माने यांनी थेट पत्रकार शितल कुमार मोटे यांच्यावर एक प्रकारे आपणच उपोषणकर्त्याचे समर्थन केले आहे असे आरोप केले आहे पत्रकार दिनाच्या पूर्व संधीला एका जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने अशा प्रकारे पत्रकारावर आरोप करीत पत्रकारांचा आवाज दाबण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे आमच्यावर केलेले आरोप पोलीस निरीक्षक माने यांनी सिद्ध करून दाखवावे असा सवाल पत्रकार मोटे यांनी केला आहे
याबाबत करमाळा तालुका पत्रकार
संघटनेने सदर घटनेचा एका निवेदनाद्वारे निषेध केला आहे
पत्रकार -+शितलकुमा मोटे👆
*चौकट*
करमाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिलेल्या पत्रकाराला अपमानास्पद वागणूक निषेधार्थ आज पत्रकार दिना दिवशी करमाळा तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघटनेच्या वतीने काळे फिती लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार शितल कुमार मोटे यांनी पत्रकाराला माहिती बोलताना दिली
याबाबत अधिक माहिती देताना पत्रकार मोटे म्हणाले की करमाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांच्या दालनात माझ्यावर थेट आरोप करीत मला अपमानास्पद वागणूक दिली या घटनेच्या निषेधार्थ उद्या पत्रकार दिनाच्या दिवशी करमाळा शहर तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार करमाळा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून सदर घटनेचा निषेध करणार आहे
सदर आंदोलनामध्ये करमाळा शहर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार मोटे यांनी केले आहे
याबाबत पत्रकार बांधवांनी करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा यांना याबाबतचे निवेदन दिले आहे
*या घटनेचा "टाइम्स 45 न्यूज मराठी चे "संपादक व समूहाच्या वतीने जाहीर निषेध* ✖️✖️✖️✖️






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा