Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

भरणेवाडी येथे इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व वयोश्री योजनेतील ४२७९ लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या २० हजार सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप

 *कार्यकारी --संपादक* 

*एस.बी.तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-8378 081 147*


भरणेवाडी येथे इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व वयोश्री योजनेतील ४२७९ लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या २० हजार सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले.

   हा उपक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगमच्या विशेष सहकार्यातून राबवण्यात आला. या प्रतिष्ठानच्या वतीने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या एडीप व आरव्हीवाय योजनेतून तालुक्यातील दिव्यांग व वयोश्रींची तपासणी करवून सहाय्यक उपकरणांची मागणी केली होती.



     त्यानुसार कृषिमंत्री भरणे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. रविवारी झालेल्या कार्यक्रमात भरणे यांनी मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

  कृषिमंत्री भरणे म्हणाले, आपण आयुष्यभर तालुक्यातील गोरगरीब जनता व अपंग, वयोश्रींचा सेवक म्हणून काम करणार आहे. सामान्य नागरिकाला उगाचच कामासाठी उंबरे शिजवायला लावणं माझ्या स्वभावात नाहीजगात देव शोधण्याची गरज नाही आपल्या घरातील आई-वडिलांची अपंगांची दिव्यांगांची सेवा करा, तुम्हाला आपोआप देव मिळेल या योजनेतील काही लाभार्थी राहिलेले आहेत. त्यांना येणाऱ्या काळात वस्तूंचे वाटप केले जाणार आहे.



   या वेळी क्षेत्रीय विपणन केंद्राचे उपप्रबंधक केशव गीते, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, नगराध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोंकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, श्रीमंत ढोले, हनुमंत बंडगर, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, छत्रपतीचे संचालक तानाजी शिंदे, राहुल जाधव, सचिन सपकळ, कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी सरपंच राहुल साबळे, दीपक भरणे, गुलाब म्हस्के, संजय चव्हाण, प्रतिष्ठानचे अनिकेत भरणे, श्रीराज भरणे, अभिजित भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

          * *सदर साहित्याचे झाले वाटप*

या कार्यक्रमात मानेचा पट्टा (३५३), कमोड सह चेअर स्टूल (१६२९), फोल्डेबल वॉकर (१०५), गुडघ्याचा पट्टा (७०९६), कमरेचा पट्टा (३६६०), सिलिकॉनफोम उशी (११०६), पाठीचा पट्टा (१९२), टेट्रापॉड (९०४), ट्रायपॉड (५१८), चालण्याची काठी (१०७२), समायोज्य चालण्याची काठी (११०१), सीटसह चालणारी काठी (६०), व्हीलचेअर फोल्डिग (११६६), श्रवणयंत्र (७२८).

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा