*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनात कार्यरत असताना शासनाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीरित्या हाताळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे चोरी, दरोडा, खून, हाणामारी, बलात्कार, गुंडगिरी यावर अंकूश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर केला जातो. अहोरात्र मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागते. त्यातच लोकप्रतिनिधी, खासदार, न्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती, सचिव सारख्यांचा दौरा असल्यास वेळप्रसंगी त्यांना पिण्यासाठी साधं पाणीही मिळत नाही. जेवणाचा विषय तर फारच लांब राहिला. भर उन्हात उभे राहावे लागते. कधी कधी तर ठरलेला दौरा देखील अचानक रद्द होतो, हि वस्तुस्थिती आहे यात शंका नाही. महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी वर्ग संख्या कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्यावर कामांचा ताण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र शासन पूर्णपणे पोलीस भरती प्रक्रिया राबवत नाही. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम दिवट्या दिल्या जातात. यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या परिवाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. पोलीस एकीकडे नोकरी तर दूसरीकडे परिवार अशा कचाट्यात सापडले आहेत. या निमित्ताने एका म्हणीची आवश्यक आठवण येते 'आई भीक मागू देत नाही, बाप पोट भरू देत नाही.' अशी दयनीय अवस्था पोलीस कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यातच पोलीस कर्मचारी यांना कोणतीही संघटना बांधण्याचा अधिकार नसल्याने त्यांना कायमस्वरूपी अन्याय सहन करावा लागतो.
अशा अवस्थेत न्याय कूणाकडे मागायचा असा प्रश्न पडतो. निवडणुका आल्या-गेल्या, मोर्चा, जमावबंदी, वाहतूकीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची गरज भासते. केवळ आपल्या स्वतःच्या हितासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा सर्रासपणे वापर केला जात तर नाही ना? निवडणुका आल्या-गेल्या निवडून येणारे येतात आणि जातात. पोलीस कर्मचाऱ्यांना याचा काय फायदा होतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणुका लढवायचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याची वेळ आली तर केवळ गाजर दाखविला जातो काय? हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारांना मतदान मिळावं यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर मलीदा वाटप करण्यात येत असल्याचे समजते. पोलीस कर्मचारी आपल्यासाठी सतत झटत असताना त्यांना भत्ता देण्यासाठी मागेपुढे पाहण्याचे कारण काय? शासनाने यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. असाच एक प्रकार सध्या कल्याण येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडत असल्याने त्यांचे दूःख वाटत आहे. तेथील इमानदार व प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळणारा भत्ता देखील स्विकारला नसल्याचे सांगितले. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यात नाराजीचा सुर निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा