Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

*स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे* *स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न…*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे  स्नेहसंमेलन अविष्कार 25-2026 उत्साही वातावरणात संपन्न झाले आहे. करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाडी-वस्ती वरील सामान्य कुटुंबातील चिमुकले कलाकारांनी देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीते यावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनिताई सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी, स्नेहालय स्कूलचे संचालक रामचंद्र दळवी, द्रौपती वाघमारे, सुमन दळवी, सुलोचना दळवी, प्रियांका गायकवाड उपस्थित होते.


यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मँडम यांनी प्रास्ताविक केले तर नगराध्यक्षा मोहिनिताई सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  स्कूलच्या सहशिक्षिका शिवांगी कांबळे, अश्विनी पाटील, रोहीणी गरड, सुनंदा दुधे, आशा पाटणे, पूजा पाटील, आश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, आसिफ मणेरी सर्व टिचर्स कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे पालक वर्ग श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन           यांनी तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा