Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

*कॉलेज ऑफ फार्मसीच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ.*

 *अकलूज --प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज यांचे वतीने मौजे बोंडले (ता.माळशिरस) येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे उद्  घाटन माजी पंचायत समिती सदस्य भागवत पाटील यांचे शुभहस्ते सहकारमहर्षी शंकरराव मोहिते -पाटील व अक्कासाहेब यांचे प्रतिमा पूजनाने करण्यात आले. 



           यावेळी भागवत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या शिबिराच्या विविध उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.बोंडले गावाचे सरपंच तसेच सर्व सदस्यांनी शिबिरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्निल राजे-घाडगे यांनी केले.शिबिरामध्ये राबवल्या जाण्याऱ्या उपक्रमाची माहिती उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दिली.शिबिरामध्ये परिसर स्वछता, वृक्ष लागवड,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर,नवीन मतदार नोंदणी,समाज प्रबोधन व्याख्यान असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबले जाणार आहे




            या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोंडले येथील आनंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र लोंढे, धनाजी जाधव,सौ.पार्वती नाईकनवरे,सौ.साधना पाटील,माजी उपसरपंच लालासाहेब जाधव,मंगेश माने-देशमुख,पंडित माने -देशमुख, अविनाश माने- देशमुख,जि.प.प्रा. शाळा बोंडलेचे मुख्याध्यापक सोमनाथ गमे,प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडलेचे डॉ.सुनील देवकाते,आरोग्य सेविका सौ.रुपाली भानवसे,प्रा. महेश मिटकल,प्रा.रविराज जळकोटे,प्रा.बापूराव अंकलगी,प्रा. शुभांगी खरात,प्रा.ऐश्वर्या फुटाणे, शिक्षकेतर कर्मचारी,स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा