कार्यकारी संपादक
एस.बी.तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-8378081147
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन नरसिंहपूर परीसरात मोठ्या उत्साहात पण साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चाॅकलेट, गोळ्या, मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी लहान बालकांनी महापूरूषांवर भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ सुमित्रा कोकाटे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य सहाय्यीका प्रियांका पाटील, आशासेविका रफिया तांबोळी, पुष्पा ठोकळे, सुरेखा क्षीरसागर, रूपाली चव्हाण, विद्या देशमुख, मालन जगताप, सारिका वाघमारे, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.
नरसिंहपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अर्चना नितीन सरवदे, उपसरपंच पप्पू गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच टणू ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच तेजस मोहिते व उपसरपंच सारीका लावंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात ध्वजारोहणानंतर झेंड्याला सलामी करताना दिसत आहेत.
------------------------------: जाहिरात:---👇





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा