Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

*मुंबईतल्या निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, "ही लढाई मराठी माणसाला योग्य सन्मान मिळेपर्यंत चालू राहील"*

 *संपादक --हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



मुंबईसह २९ महापालिकांचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला आहे. राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपाचं कमळ फुललं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची. या निवडणुकीत भाजपा महायुतीला ११६+ जागा मिळाल्या आहेत. मुंबईत भाजपाचा महापौर होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख जयचंद असा केला होता. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर…

एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर भाजपाच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरीही मुंबईत महापालिकेवर भाजपाचा महापौर बसला नसता. मला शनिवारवाड्यावरचा प्रसंग आठवतो, शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत याने मराठ्यांचा जरी पटका उतरवला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. ईस्ट इंडिया कंपनीला महाराष्ट्रात प्रवेश दिल्या. जयचंद किंवा बाळाजी पंतांच्या या अवलादी आहेत. भाजपा आणि शिंदे यांच्याकडे तीनचं बहुमत आहे. ११० लोक विरोधात त्यात शिवसेना आणि मनसेचे विरोधक आहेत. हा विरोधकांचा आकडा कमी नाही इकडची काडी तिकडे करु देणार नाही. महापौर गमावला हे महाराष्ट्र आणि मुंबईकरांचं दुःख आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

ही लढाई अजून संपलेली नाही… मराठी माणसाला योग्य सन्मान मिळेपर्यंत अशीच सुरू राहील! असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पोस्ट केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा