*संपादक --हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
कनगरा, ता. धाराशिव येथील महाविकास आघाडीचे उपसरपंच श्री. सुरज इंगळे, सोसायटी चेअरमन श्री. रवींद्र इंगळे तसेच माजी सरपंच श्री. मधुकर गंगणे यांनी आपल्या अनेकb सहकाऱ्यांसह भाजपची विकासनिष्ठ विचारधारा स्वीकारत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. जगन्नाथ इंगळे, श्री. नितीन इंगळे, श्री. गोविंद झोरे, श्री. लाला शेख, श्री. गोपाळ दंडगुळे, श्री. दगडू इंगळे, श्री. समाधान बनसोडे, श्री. किरण राऊतराव, श्री. जनार्धन राऊतराव, श्री. महेश इंगळे, श्री. अमर इंगळे, श्री. बालाजी इंगळे, श्री. अण्णासाहेब इंगळे, श्री. सचिन इंगळे, श्री. अजय पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला.
या प्रवेशामुळे पाडोळी गटात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख व विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच आपल्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत भाजपच जनतेचा विश्वास जिंकणारा पक्ष आहे, असा ठाम विश्वास नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पाडोळी (आ) गटातील भाजपच्या उमेदवारास गावातून मोठे व निर्णायक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला.
यावेळी श्री. सुधाकर गुंड गुरुजी, श्री. शिवाजी बोधले, श्री. उद्धवबाबा पाटील, श्री. संजय दळवे, श्री. महेबूब शेख, श्री. तानाजी गायकवाड, श्री. अजित खापरे, श्री. संगमेश्वर पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#भाजप #पक्षप्रवेश #धाराशिव #BJP #Dharashiv #विकासाचेराजकारण
https://www.facebook.com/share/1AjmNM7Asu/






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा