*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*अलीम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेल्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती उद्या रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी आज येथे दिली याबाबत अधिक बोलताना गणेश चिवटे म्हणाले की करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांकरता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती भाजपाचे जिल्हाध्यक्ष माननीय चेतन सिंगजी केदार तसेच भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या उपस्थितीत होणार आहेत
यावेळी इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विद्यानगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका भारतीय जनता पार्टी आपल्या पूर्ण ताकदीवर लढणार असून यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल असा आत्मविश्वास यावेळी गणेश चिवटे यांनी व्यक्त केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा