*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
उजनीच्या गाळपेरीचीच्या जमीनीवर शेतकऱ्यांना पिके घेऊ द्या, गाळपेर जमीन ताब्यात घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी शासनाकडे केली आहे. राज्य शासनाने एक धक्कादायक निर्णय घेतला असून राज्यातील नदीकाठी असलेल्या व अधिगृहित केलेल्या जमिनी राज्य शासन ताब्यात घेणार आहे. याबाबत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना तशा प्रकारची नोटीस जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यावर आज तातडीने आमदार नारायण आबा पाटील यांनी लक्ष दिले असुन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, जिल्हाधिकारी आदिंना निवेदन पाठवले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील तीस गावांनी उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपल्या चांगल्या जमीनी, राहती घरे, वाडे व गावे पाण्याखाली घातली. एका राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पास उभारताना भरीव योगदान दिले. शेतकऱ्यांनी आपली कसदार व सुपीक जमीन जलाशयासाठी दिली होती. मात्र त्याकाळात शासनाने अत्यल्प मोबदला देत पुनर्वसन केले. परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले. उपजीविकेसाठी या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी गाळपेर जमीन वापरण्यास सुरुवात केली व कसेबसे आपला उदरनिर्वाह चालवला आहे. गाळपेर जमीन ताब्यात घेऊन अतिक्रमण बाजुला सारण्याच्या कारणास्तव शासन या जमीनीवर कंपाऊंड घालून सदर जमीनी पीपीपी तत्वावर खाजगी संस्थांना देण्याच्या विचारात आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील हजारो शेतकरी उध्वस्त होतील व भुमिहिन होतील. यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा असे साकडे आमदार नारायण आबा पाटील यांनी या निवेदनातुन सरकारला घातले आहे.
----------------------
पाटील गटातील पदाधिकाऱ्यांनी घेतली तहसीलदार यांची भेट ..
आमदार नारायण आबा पाटील यांनी जलसंपदा मंत्री, पुनर्वसन मंत्री व जिल्हा अधिकारी यांना निवेदन पाठवले तसेच तहसिलदार यांना पाटील गटाचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष तहसिल कचेरीत जाऊन निवेदन दिले. यावेळी आदिनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील,
पाटील गटाचे मार्गदर्शक अर्जुन सरक सर, उपसभापती दत्ताकाका सरडे,संचालक दत्ताबापु देशमुख, जेष्ठ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संचालक विजय नवले, संचालक संतोष पाटील, संचालक सागर पोरे,संचालक रविकिरण फुके, संचालक रामेश्वर तळेकर, सरपंच विकास गलांडे,विशाल तकीक, ज्ञानेश पवार, निवृत्त पाटबंधारे अभियंता श्रीहरी कदम, संतोष वारे,सरपंच मेनकुदळे,अविनाश सरडे आदि उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा