*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शरदचंद्र महाविद्यालय व के. एन. ज्युनिअर कॉलेज शिराढोण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. एन. ज्युनिअर कॉलेजचे गणित विभाग प्रमुख प्रा. श्री. काळे एम एन प्रमुख पाहुणे मराठी विभागाचे प्रा. डॉ. तांबोळी एफ.ए. होते. कार्यक्रमात प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. तांबोळी एफ. ए. यानी उपस्थिततांना मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आलेख मांडला. तसेच तत्कालीन परिस्थितीत आपल्या मुलावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर योग्य संस्कार केल्यामुळे स्वराज्य उभे राहिले असे मत मांडले. तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या कार्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. एन. ज्युनिअर कॉलेजचे प्रा. श्री. काळे सर यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. घोलप के. जी. यांनी केले. सूत्रसंचालन भूगोल विभागाचे प्रा. डॉ. शिरमाळे एम. बी. यांनी केले. आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आलटे एस. एम. यांनी मानले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा