*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आजच्या युगाचा पोलीस म्हटले की अनेकांच्या मनात भीती येते मात्र करमाळा तालुक्यातील एका घटनेने पोलिसांची मान उंचावेल अशा पद्धतीचे कार्य अहिल्यानगर टेंभुर्णी या महामार्गावर कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल आनंद पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कार्य करीत आजही माणुसकी जिवंत ठेवल्याचे उदाहरण पहावयास मिळाले
त्याचे झाले असे अहिल्यानगर येथून सोलापूर कडे एम पी एस ची परीक्षा देण्यासाठी पती पत्नी चार चाकी गाडीने दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी जात असताना अचानक मांगी ते करमाळा महामार्ग दरम्यान टोलनाक्याच्या पुढे चढावर गाडीचा घोटाळा झाला रात्रीचे चार ते पाच वाजले काही सुचेना परिक्षेला जाणं गरजेचं होतं हार न मानता त्यांनी 112 पोलीस मदतीसाठी कॉल केला तो कॉल कॉन्स्टेबल आनंद पवार यांच्याकडे गेला त्यांनी त्यावेळेस त्यांना विचारलं नेमकं काय झालं त्यानी सांगितले सोलापूरला एम पी एस सी परीक्षा देण्यासाठी माझी पत्नी मिनाज कुरेशी हीला वेळेवर जावं लागणार आहे
तरच माझ्या पत्नीला परीक्षा देता येणार आहे आणि शंभर टक्के त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होणार आहे यावेळेस हे ऐकून आनंद पवार यांना काय सूचेना शासकीय गाडी बंदोबस्तासाठी गेली होती पवार यांनी स्वतःची शिफ्ट गाडी घेतली आणि मागींच्या दिशेने निघाले त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं तुम्ही देवासारखे धावून आलात मी जर आज वेळेवर गेले नसते तर मला परीक्षा देता आली नसती अशा वेळेस पवार यांनी करमाळा मध्ये आल्यावर त्यांना तिथे सोडले नाही तर पहाटेची रेल्वे आहे का एसटी बस आहे का ती वेळेवर पोहोचेल का याची सर्व चौकशी केल्यानंतर त्यांनी लवकर कसं पोहचता येईल यासाठी पहाटेची पेपरची गाडी त्या गाडीमध्ये त्या दोघा नवरा बायकोला बसून सोलापूरला पाठवले
आणि ती सुखरूप पोहोचले त्यांनी परीक्षाही दिली त्यांनी कॉन्स्टेबल आनंद पवार यांचे कौतुक करून सांगितलं मी सिलेक्ट झाल्यानंतर पहिला तुम्हाला फोन असेल ते अहिल्यानगर येथील एका मुस्लिम समाजातील मिनाज अविद कुरेशी असे नाव आहे त्याच्याशी फोनद्वारे सर्पंक केल्यावर त्यांनी आनंद पवार यांचे आभार मानून झालेली हकिकत सांगितली मी सोलापूरला साडे नऊ वाजता वेळेत पोहोचले मला करमाळा येथील पोलिस दादानी सहकार्य केल्यामुळे सुखरूप वेळेवर पोहचले.
करमाळा पोलीस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या एका जाबाज व निर्भीड पोलीस कर्मचाऱ्यांने वेळीच कुरेशी कुटुंबीयांना माणुसकी दाखवल्याने सौ कुरेशी मॅडम ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ शकल्या पोलीस कर्मचारी आनंद पवार यांनी वेळीच दाखविलेल्या या माणुसकीचे जिवंत उदाहरण आजच्या तरुण पिढीला एक प्रकारे मार्गदर्शन ठरविणारे असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा