*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
स्वराज्याचे धाकले
धनी, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन किल्ले पुरंदर येथे ३४६ व्या श्री शंभूराज्याभिषेक सोहळ्यास १६ जानेवारी रोजी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असून शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट (पुणे) यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक, उद्योजकता व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शंभुगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील सर्व सामाजिक संघटनांचा सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल संयुक्तपणे सन्मान करण्यात येणार आहे. एसव्ही ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. मनोज कदम यांना उद्योजकता क्षेत्रातील कामगिरीबद्दल, तर पत्रकार हर्षल बागल यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात येणार आहे. तसेच शेटफळ येथील नागनाथ लेझीम संघ मोठया संख्येने किल्ले पुरंदर येथे आकर्षक असेल लेझीम सादर करणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने करमाळा तालुक्यातील शंभूभक्त उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुहास पोळ, संभाजी ब्रिगेड जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ निलेश पाटील,हेमंत शिंदे, सोमनाथ जाधव, यांनी दिली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा