*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित,कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज यांच्यावतीने मौजे बोंडले (ता.माळशिरस) येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात कै.सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व कै.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्निल राजे- घाडगे यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबलेल्या आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर,जनजागरण रॅली,अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा, सर्प विज्ञान कार्यशाळा,रक्तदाब व मधुमेह तपासणी,ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण असे केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली. समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, विशेष श्रमसंस्कार शिबिराचा व्यापक दृष्टिकोन समजावून सांगत भविष्यात विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रहित जोपासण्यास प्रोत्साहित केले.तसेच बोंडले गावातील ग्रामस्थांकडून श्रमसंस्कार शिबीरासाठी केलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालाच्या वतीने ग्रामस्थांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावचे सरपंच विजय देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्यात सातत्य ठेवण्यास सांगितले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंडित माने-देशमुख कार्यक्रमास उपस्थित होते.त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये गेली आठवडाभर बोंडले गावामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तीचे आणि नियोजनात्मक कामाचे कौतुक करत भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे,सरपंच विजय देशमुख,उपसरपंच प्रतिनिधी आनंद जाधव,ग्रामपंचायत सदस्य धनाजी जाधव,ॲड.रणजीत माने -देशमुख,माजी उपसरपंच लालासाहेब जाधव,ग्रामपंचायत अधिकारी सौ.कोमल शिंदे,श्री.संत तुकाराम विद्यालय बोंडलेचे मुख्याध्यापक शहाजी दुपडे, जि.प.प्रा.शाळा बोंडलेचे मुख्याध्यापक सोमनाथ गमे तसेच कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ.मुकुंद गाडे,महेश मिटकल,सौ.शुभांगी खरात,सुनील चव्हाण,ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सिद्धार्थ बसाटे व रिहान शेख यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा