*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जेऊर ता करमाळा येथील सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते महेश रणदिवे यांना नुकताच सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय रक्तवीर पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. कारगिल वॉर हिरो लॉन्स नायक दिपकचंद प्रख्यात यांच्या हातून महेश रणदिवे यास हा पुरस्कार देण्यात आला. गेली अनेक वर्षे झाले सामाजिक कार्यकर्ते महेश रणदिवे हे सन २०१० पासून मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रात सामाजिक कार्य करत असुन त्यांनी देशभरात हजारो मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
आजवर लाखो रक्तदात्यांना प्रोत्साहित करुन त्यांनी रक्तदानाची मोहीम राबवली. कोवीड काळात हजारो नागरिकांचे प्राण वाचवण्यात सामाजिक कार्यकर्ते महेश रणदिवे यांनी पुढाकार घेतला. रक्तदान शिबीरा बरोबरच त्यांनी मोफत रुगण शिबीर राबवले. महेश रणदिवे यांनी स्वतः शेकडो वेळा रक्तदान केले. कॅन्सर रुग्णांसाठी प्लेटलेट रक्ताची मदत, अक्सिडेंट रुगणाला तातडीने रक्त उपलब्ध करून देणे थेलसीमिया मुलानं साठी रक्तदान शिबिर व मोफत रक्त साठा उपलब्ध करून देणे , गोर गरीब चे ऑपरेशन साठी मदत करणे आदि कामांमुळे महेश रणदिवे यांना देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच राज्यपालांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
आज त्यांना कारगिल वॉर हिरो लॉन्स नायक दिपकचंद प्रख्यात यांच्या हातून दिला जाताच करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी थेट महेश रणदिवे यास भ्रमणध्वनी लावला व त्यांचे अभिनंदन केले. या अगोदरही पै पृथ्वीराज पाटील युवा मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते महेश रणदिवे यांचा प्रत्येक पुरस्कार प्राप्त होताच आनंदोत्सव साजरा करुन महेश रणदिवे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते महेश रणदिवे यांना देशातील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार नारायण आबा पाटील, जेऊर ता करमाळा येथील सरपंच पृथ्वीराज पाटील व सर्व ग्रामस्थ, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, भारत महाविद्यालयाचा एनसीसी विभाग तसेच परिसरातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
महेश रणदिवे यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाददिवसाला ५० वे रक्तदान केले तर आता पुरस्कार घेताना thalsimya ruganala 51 वे रक्तदान करून पुरस्कार स्वीकारला , तसेच आता २०२५ मध्ये पुरस्थिती मध्ये शालेय साहित्य, शाळेला कपाटे दिले होती तसेच करमाळा तालुक्यातील गरीब रुग्णाचे ऑपरेशन तसेच मोफत रक्त पुरवठा केला आहे..







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा