लोहारा--+ प्रतिनिधी
यशवंत भुसारे
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुळजापूर आगारातून तोरंबा–उंडरगाव–मार्डी–बेंडकाळ मार्गे लोहारा अशी नवीन एस.टी. बस सेवा सुरू होताच उंडरगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करून पेढे वाटून आनंद व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूर ते लोहारा दरम्यान तोरंबा, उंडरगाव व मार्डी मार्गे थेट एस.टी. बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी होती. या बाबत ग्रामपंचायत ठराव निवेदन देऊन ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता अखेर ही मागणी २३ जानेवारी रोजी शिंदे सेनेचे धाराशिव लोकसभा अध्यक्ष युवा नेते आनंद सतीशराव पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या ऐतिहासिक क्षणी उंडरगाव ग्रामस्थांच्या वतीने बसचे चालक एल एस सोनवणे व वाहक एम सी कोलपुसे मॅडम यांचा शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार करून सन्मान करण्यात आला. नवीन बससेवा मार्गस्थ करताना ग्रामस्थांनी जल्लोषात आनंद साजरा केला.सदर एस.टी. बस तुळजापूर आगारातून नित्यनेमाने सकाळी ९ वाजता सुटणार असून, लोहारा येथून दुपारी ४ वाजता मार्डी–उंडरगाव मार्गे पुन्हा तुळजापूरकडे रवाना होणार आहे. या बससेवेचा लाभ प्रवासी वर्गासह जेष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन बससेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दळणवळण तालुक्याच्या ठिकाणी ये जा कामासाठी अधिक सुलभ होणार असून शिक्षण, आरोग्य व दैनंदिन कामासाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी युवराज तोडकरी,श्रीकृष्ण गंगणे,कुंडलीक सुर्यवंशी, हिराचंद मोरे, देवाप्पा बिराजदार, बालाजी सूर्यवंशी,राम गंगणे,शिवाजी सुर्यवंशी, रमेश साखरे, ज्ञानेश्वर गंगणे, भैय्या रवळे, पिंटु शिवकर महादेव रवळे, अर्जुन रोडगे, बलभीम रवळे, हिरकणाबाई सुर्यवंशी, मंगलबाई सुर्यवंशी , ज्योत्स्ना तोडकरी, विमलबाई सुर्यवंशी, मुद्रीकाबाई पाटील, आदी महिला ,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा