*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यात सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची जोरदार तयारी असून यामध्ये करमाळा तालुक्यात चे लक्ष वेधु इच्छिणाऱ्या विशेषता केम जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये प्रथमतःच कंदर येथील युवा नेतृत्व गेली तीस वर्ष अविरतपणे सेवा करणारे अण्णासाहेब पवार यांचे धर्मपत्नी सौ साधना अण्णासाहेब पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत मतदाराच्या आग्रहास्तव त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत गोरगरिबांची सेवा करणे तसेच मतदाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या येत्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होऊ पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या केम गटामधून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उभे राहून आपले नशीब आजमावत आहेत
कंदर येथील युवा नेतृत्व अण्णासाहेब पवार यांनी आज पर्यंत त्यांच्या राजकीय इतिहासामध्ये गोरगरिबांची सेवा केली असून याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप शालेय विद्यार्थिनींना दत्तक घेणे तहानलेल्यांना जारच्या पाण्याचे वाटप करणे सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा नेतृत्व असणारे अण्णासाहेब पवार यांनी आजपर्यंत सर्व जाती धर्माला आपुलकीने वागणूक दिली आहे याशिवाय कित्येक अनाथ मुलींचे लग्न लावून दिले आहे याशिवाय अडीचशे गरजू लोकांचे विनामूल्य डोळ्यांचे ऑपरेशन प्रतिष्ठान च्या वतीने मोफत करून दिले आहे 13 जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना स्कूलच्या बॅगचे वाटप तसेच पाण्याची सोय अशा एक ना अनेक प्रत्येक सामाजिक उपक्रम राबवून अण्णासाहेब पवार यांनी त्यांच्या परिसरामध्ये आपले नाव सामाजिक उपक्रम राबवून उंचावले आहे अशा या स्वाभिमानी नेत्याला आजही केम जिल्हा परिषद गटातील मतदार विसरत नाही त्यांच्या कार्याचा आलेख उंचावलेला आहे याशिवाय कंदर तसेच परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणीच्या कामावर स्वतः लक्ष देणे कार्य तडीस नेणे अशा पद्धतीने अण्णासाहेब पवार यांनी कंदर तसेच परिसरात एक प्रकारे समाजाभिमुख नावलौकिक कार्य केल्यामुळे भविष्यात मतदार त्यांना निश्चित मते देतील व त्यांच्या पत्नीला केम गटामधून काम करण्याची संधी देतील अशी ग्वाही कंदर तसेच परिसरातील विशेषता केम गटातील मतदार बोलून दाखवित आहे
केम गटातील प्रलंबित कामे विजेचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तसेच भविष्यात मतदाराच्या अडीअडचणी सोडवणे कामी मी सदैव तत्पर असून भविष्यात देखील मी मतदाराची कामे करीत राहणार याशिवाय मतदारांनी मला दिलेल्या मतरूपी मतदानातून माझ्या केम गटाचा कायापालट केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाच्या उमेदवार सौ साधना पवार यांनी शेवटी बोलताना आपले मत व्यक्त केले
प्रचारात मात्र आघाडी व उत्साह,,,,,,,
केम जिल्हा परिषदेच्या गटामधून आता पासूनच युवा नेतृत्व अण्णासाहेब पवार तसेच त्यांच्या धर्मपत्नी सौ पवार यांनी होम टू होम प्रचार करून एक प्रकारे प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी मिळवली आहे या प्रचाराच्या आघाडीमध्ये त्यांना सर्व जाती धर्माच्या मतदाराचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून यामुळे उमेदवाराचा उत्साह देखील वाढलेला दिसत आहे एकंदरीत पाहता त्यांना जिल्हा परिषदेच्या केम गटातील मतदारांनी त्यांना वाढता पाठिंबा दिलेला आहे हे चित्र सध्या केम जिल्हा परिषदेच्या गटात पहावयास मिळत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा