Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

यशवंतनगर पंचायत समिती गणात शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव शिवराम गायकवाड यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल... क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा परिषद निवडणुकीत मारली एन्ट्री

 *बोरगाव-- प्रतिनिधी*

टाइम्स 45 न्यूज मराठी 



बऱ्याच वर्षापासूनच्या प्रतिक्षेनंतर  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीला मुहुर्त मिळालेला आहे

आजपर्यंतच्या निवडणुकीत मोहिते - पाटील विरूद्ध सर्वपक्षांचे -संघटनांचे विरोधक असे समीकरण असायचे मिनी मंत्रालय निवडणुकीत आता मात्र सध्या माळशिरस तालुक्यात वेगळीच रंगत पाहायला मिळते आहे माजी आमदार राम सातपुते प्रणित भाजप गटाविरूद्ध मोहिते-पाटील गटासोबत बर्याच सामाजिक संघटना,राष्ट्रीय पक्ष - पार्टी एकत्रित आल्याचे दिसून येत आहे अशी निवडणुकीत चुरस लागली असतानाच  माळशिरस तालुक्यात क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे शेतकर्यांचे कैवारी तथा माजी राज्यमंत्री मा.रविकांत भाऊ तुपकर साहेब यांच्या आदेशानुसार क्रांतीच्या विचाराने प्रेरीत झालेले आधुनिक भगतसिंग म्हणून शेतकरी चळवळीत नावारुपाला आलेले   शिवराम गायकवाड हे ८६- यशवंतनगर पंचायत समिती गणातून धनशक्तीच्या विरोधात शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आदर्श आचारसंहितेचे पालन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तोही उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान मंजुर झालेला आहे आणि त्यांनी आता निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहे


    ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, माळशिरस तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकर्यांना उस दर,काटामारी,रिकव्हरी चोरी, कामगारांचे शोषण,हारवेस्टर चालक, ऊसतोडणीसाठी, शेतकरी बांधवांच्याकडून केली जाणारी आर्थिक लूट व वाहनचालकांकडुन ओव्हरलोड वाहतूक व ते वाहन ओढण्यासाठी ट्रॅक्टरची,जेसिबीची विनाकारण मागणी करून आर्थिक शोषण यांसारख्या विविध प्रश्नांवर चर्चाही केली तसेच   यशवंतनगर पंचायत समिती गणातील शेतकरी,दिव्यांग,कामगार,कलावंत, वारकरी,माता माऊलींचे व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सर्व शेतकऱ्यांची भक्कम चळवळ उभी करायची आहे असे आश्र्वासन त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे

शेतकऱ्यांच्या वेदना संपविण्यासाठी आम्ही आतापर्यंत लढत आलो आहे आणि पुढेही तितक्याच ताकदीने लढत राहणार...

-शिवराम गायकवाड 

अध्यक्ष, क्रांतीकारी शेतकरी संघटना

 ८६- यशवंतनगर पंचायत समिती गण अपक्ष उमेदवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा