*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब मस्कर यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटात प्रवेश केला असल्याने करमाळा तालूक्याच्या राजकारणास वेगळीघ कलाटणी मिळाली आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वामनदादा बदे व तात्यासाहेब मस्कर यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या सर्व ताकदीनिशी आता पाटील गटासाठी काम करावयाचे ठरल्याने माजी आमदार संजयमामा शिंदे गटास खिंडार पडले असुन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटाची ताकद आणखी वाढली आहे.
. जेऊर ता करमाळा येथील आमदार कार्यालयात आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे व तात्यासाहेब मस्कर यांनी आमदार नारायण आबा पाटील यांचेशी प्रदीर्घ चर्चा केली व पाटील गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे, उमरड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गणपत बदे, रामचंद्र पडवळे, भागवत बदे, अनिल बदे,अतुल मस्कर,यांचेसह अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांनी पाटील गटात प्रवेश केला. यावेळी करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल भाऊ पाटील, माजी सभापती शेखर तात्या गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, राजन अण्णा पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, अंगद पठाडे आदि उपस्थित होते. आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे व पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब मस्कर आणि त्यांच्या प्रमुख सहकारी पदाधिकाऱ्यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केल्यानंतर आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी बोलताना माजी सभापती तात्यासाहेब मस्कर यांनी सांगितले की वामनदादा बदे व मी आम्ही दोघांनी आमदार नारायण आबा पाटील गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेताना आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून हा निर्णय घेतला असून करमाळा तालूक्याच्या विकासाला प्राधान्य देत आता यापुढे आम्ही पाटील गटात काम करणार आहोत. आमदार नारायण आबा पाटील यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण करत विकासाच्या वाटेवर करमाळा तालूक्यास सतत पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या करमाळा तालूक्यासाठी असलेल्या विकासात्मक दृष्टीकोनामुळे पाटील गटाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे तात्यासाहेब मस्कर यांनी सांगितले. वामनदादा बदे यांनी यापूर्वी करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याची धुरा वाहीली असल्याने त्यांचे करमाळा तालुक्यातील सर्वच भागात कार्यकर्ते, हितचिंतक व सहकारी आहेत तर तात्यासाहेब मस्कर यांनी आदिनाथ व करमाळा पंचायत समितीचा कारभार महत्वाच्या पदावर राहुन काम केल्याने त्यांच्याही अनुभवाचा व राजकीय ताकदीचा फायदा पाटील गटास मिळणार आहे. सन २०१९ च्या विधानसभा सभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांना आमदार करण्यात वामनदादा बदे व तात्यासाहेब मस्कर यांचे महत्वाचे योगदान होते. परंतु आता या दोन्ही अनुभवी व मात्तबर नेत्यांनी आमदार नारायण आबा पाटील गटात प्रवेश केल्याने शिंदे गटास धक्का बसला असुन करमाळा तालूक्याच्या राजकारणास कलाटणी मिळाली आहे. विशेषतः उमरड व वरकटणे या गावांची राजकीय समीकरणे पुर्णपणे बदलली गेली आहेत. वामनदादा बदे व तात्यासाहेब मस्कर यांच्या पाटील गटातील प्रवेशासाठी पाटील गटाचे कुशल संघटक देवानंद बागल यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी काही दिवसांपूर्वीच पाटील गटात योग्य वेळी इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले होते. यामुळे आता पुढे आणखी कोणते महत्वाचे राजकीय कार्यकर्ते आमदार नारायण आबा पाटील गटात प्रवेश करतात याची उत्सुकता आता करमाळा तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सर्वांनाच लागून राहिली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा