Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

*श्रीमती रत्नप्रभादेवी गृह विज्ञान महिला महाविद्यालयात मकर संक्रांत सण उत्साहात साजरी.*

 *अकलूज --प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयात मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी ब्युटी ऑफ ब्लॅक डे अशी थीम ठेवण्यात आली होती.या कार्यक्रमात महिला पालकांच्यासाठी उखाणे स्पर्धा व फनी गेम्स ही घेण्यात आली होती. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी काळया रंगाची सुंदर वेशभूषा केली होती व त्यानंतर समूहासमूहात रॅम्प वॉक घेण्यात आला.विवाहित महिला व पालकांच्यासाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या.     

          या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. रूपाली गांधी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच द्वितीय क्रमांक सौ. सानिका पवार तसेच तृतीय  क्रमांक सौ.नेहा गायकवाड यांना मिळाला.  सदर कार्यक्रमाची ओळख सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे यांनी करून दिली तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अमित घाडगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व सगळ्यांना तीळगुळ वाटप केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मुस्कान शेख आणि कु.अमृता मगर यांनी केले.

                 या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीच्या सभापती कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयातील प्रा.अरविंद वाघमोडे,डॉ.राजश्री निंभोरकर,डॉ. भारती भोसले,डॉ.जयश्री मनोहर तसेच सर्व विद्यार्थिनी आणि कार्यालयीन सहकाऱ्यांची साथ लाभली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा