*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
कुकडी बाबतचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे वक्तव्य करमाळा तालूक्याचा स्वाभिमान दुखावणारे असल्याचा आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांची भिलारवाडी ता करमाळा येथे सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणातून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडीचं कौतुक आपण चाळीस वर्षे झाले ऐकतोय,याचे कसलेच काम झाले नाही मी आमदार झाल्यावरच कामे सुरु झाली असा आशय असलेले वक्तव्य केले.यावर पाटील गटाकडून निषेध व्यक्त केला गेला. याबाबत अधिक सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अतिशय उपहासात्मक पध्दतीने कुकडी बाबत वक्तव्य केले असुन या विधानाद्वारे त्यांनी करमाळा तालुक्यातील आजवर झालेल्या सर्वच आमदारांचा अपमान केला आहे. यातुन केवळ माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालूक्याकडे तुच्छतेने पाहण्याचा दृष्टिकोन उघड झाला आहे. वास्तविक पाहता कुकडी प्रकल्पाचे काम १९६६ ते १९६९ दरम्यान झाले. त्यावेळी करमाळा तालूक्याचे माजी आमदार देशभक्त स्व नामदेवराव जगताप यांनी कुकडी प्रकल्पात करमाळा तालूकयाचा समावेश केला. नंतर कुकडीची कामे या तालूक्यात सुरु झाली. पुढे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही पाण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नंतर माजी राज्यमंत्री स्व दिगंबर मामा बागल यांच्या कालावधीतही या योजनेच्या माध्यमातून पाणी आणले गेले. माजी आमदार श्रीमती शामलताई बागल यांनी कुकडीचे कार्यालय करमाळा तालूक्यात आले पाहिजे यासाठी प्रयत्न केले. यानंतर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये सन २०१४ ते २०१९ मध्ये कुकडीची तृतीय सुप्रमा मंजुर करत असताना महत्वाची भुमिका बजावली व सुमारे चार हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळवली. यातुनच पोंधवडी चारीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला.आमदार नारायण आबा पाटील यांनी पहिल्या टर्म मध्ये कुकडीची सतरा तर चालू टर्म मध्ये तीन अशी एकुण वीस आवर्तने करमाळा तालूक्यास मिळवून दिली. मांगी तलावाचा कुकडीत समावेश करावा अशी मागणी केली. कुकडीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी उजनीत सोडुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेद्वारे ते करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात दिले जावे यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाठपुरावा चालू ठेवला. कुकडीचे आवर्तन पाणी करमाळा तालुक्यातील क्षेत्रात प्रवेश केल्यावर गृहीत धरावे वा पाणीपाळी मोजावी अशी मागणी करुन बदल करुन घेतला. यामुळेच काल परवा दिले गेलेले आवर्तन सात दिवसाऐवजी अकरा दिवस चालले. यामुळे करमाळा तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधीनी कुकडी बाबत सकारात्मकता दाखवत कामे केली असतानाही माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अतिशय उपहासात्मक पध्दतीने कुकडीबाबत वक्तव्य करुन आजवर करमाळा तालुक्यातील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा अपमान केला आहे. विशेषतः दिवंगत लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी शंका व्यक्त करुन तालुक्यातील जगताप व बागल गटाचाच नव्हे तर संपुर्ण करमाळा तालूक्याचा अपमान केला आहे. आपणच कसे कामाचे आहोत हे दाखवतानाचे त्यांचे हे वक्तव्य करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनाला वेदना देणारे असे आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे हे आजपर्यंत करमाळा तालुक्यातील नेतेमंडळींना निष्क्रिय दाखवण्याचा सतत प्रयत्न करत आले आहेत. स्वतः कुकडीचे पाणी ते शेतकऱ्यांना देऊ शकले नाहीत. मागे तर संजयमामा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पेपरबाजी करताना कुकडीचे प्रणेते व जनक आपणच आहोत असे लेख पैसे व जाहिराती देऊन प्रसिद्ध केले होते. त्यांनी सतत करमाळा तालुक्यातील नेतेमंडळींना कमी लेखले आहे. माजी आमदार श्रीमती शामलताई बागल ह्या २००९ मध्ये आमदार म्हणुन निवडुन आल्या असता याच शिंदे बंधुनी श्रीमती शामलताई बागल यांना काम करु दिले नाही. त्यांची सही असलेली कोरी लेटरहेड लेटरपॅड शिंदे बंधुनी स्वतः जवळ ठेवली व छत्तीस गावात याचा उपयोग जनतेला वेठीस धरण्यासाठी केला. आपल्या करमाळा तालुक्यातील एका महिला आमदारास काम करु न देण्याचे पाप माजी आमदार संजयमामा शिंदे व त्यांच्या बंथुनी केले. यावरुन शिंदे हे करमाळा तालूक्यास कमी लेखतात हे दिसुन आले. यामुळेच आज शिंदे गटाबरोबर कोणताच गट युती करायला तयार होत नाही. आता तरी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे व वेळीच करमाळा तालुक्यातील जनतेची माफी मागावी अन्यथा शिंदे गटाला या निवडणुकीत याची फार मोठी किंमत मोजावी लागेल असा सुचक इशारा प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा