Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

*एस टी महामंडळाच्या प्रवासामध्ये प्रवास करीत असताना आता होणार दिव्यांग व्यक्तीच्या ओळखपत्राची तपासणी* *बनावट दिव्यांग ओळखपत्र सापडल्यास होणार पोलीस कारवाई*

 **करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


दिव्यांग व्यक्तीच्या ओळखपत्राचे आता काटेकोरपणे तपासणी होणार असून जर का दिव्यांग व्यक्ती जवळ बोगस ओळखपत्र सापडले तर त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे राज्यभरातील काही दिव्यांग व्यक्ती एसटी महामंडळाचा प्रवास हा आपले ओळखपत्र दाखवून बिनधास्त करीत आहे यामध्ये काही राज्यभरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आले आहे यामध्ये काही व्यक्ती धडधाकट असतानाही दिव्यांग व्यक्तीचे बोगस आधार कार्ड दाखवून बिनधास्तपणे दिव्यांग व्यक्तीच्या नावाखाली प्रवास करीत आहे अशा बोगस दिव्यांग व्यक्तीची आता राज्य शासनाने चौकशी केली आहे 

 दिव्यांगत्वाच्या आधारे राज्य परिवहनमार्फत प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी करणेबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी कळविले आहे.


दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ तसेच शासनस्तरावरुन वेळोवेळी निर्गमित आदेशांनुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, या सवलतीचा लाभ केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच मिळावा या दृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने, राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्व ओळखपत्राची तपासणी करण्यासाठी वाहक / तिकीट तपासणीस यांनी UDID Dept. of Empowerment of Pw D हे मोबाईल अॅप्लीकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. सदर मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचा क्रमांक व जन्म दिनांक नमूद करुन सदर वैश्विक दिव्यांग ओळखपत्राच्या (UDID) वैधतेची पडताळणी करावी. पडताळणीअंती ओळखपत्र वैध असल्यास संबंधितास लाभ देण्यात यावा. तथापि, ओळखपत्र बनावट, अवैध अथवा चुकीचे आढळून आल्यास, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम-९१ नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच, सदर ओळखपत्र जप्त करुन त्याबाबत दिव्यांग कल्याण विभागास कळविण्यात यावे असे तुकाराम मुंढे यांनी महामंडळाच्या उपाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात कळविले आहे.


       चौकट 

करमाळा तालुक्यातील घोटी येथील गटविकास अधिकारी राऊत यांच्या सतर्कतेमुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींना न्याय......

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण अधिकारी म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी व मूळचे करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोज राऊत यांच्याकडे पदभार होता. या काळात दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या व्हीसीमध्ये हा विषय चर्चेला आला. त्यावेळी दिव्यांग कल्याण अधिकारी राऊत यांनी सचिवांना ही बाब निदर्शनाला आणून दिली होती. सोलापुरात अशा तक्रारी आल्यानंतर त्यांनी राज्य परिवहन विभागाचे सोलापूर विभाग नियंत्रक यांच्याशी पत्र व्यवहार केला. यातून ही गंभीर बाब उघड झाली. याची दखल घेत दिव्यांग विभागाचे सचिव मुंढे यांनी राज्यभर अशी पडताळणी करण्याचे आदेश काढले आहेत.

मूळचे करमाळा तालुक्यातील घोटी येथील रहिवासी असणारे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा