*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण येथील छत्रपती संभाजी राजे चौकात आज हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण वातावरणात विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जाज्वल्य विचारांना, मराठी अस्मितेला आणि हिंदुत्वाच्या विचारधारेला उजाळा देण्यात आला. उपस्थितांनी “बाळासाहेब अमर रहे” अशा घोषणा देत चौक दणाणून सोडला.
या प्रसंगी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेबांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
जयंतीनिमित्त आयोजित हा अभिवादन कार्यक्रम एकात्मतेचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारा ठरला. विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर बाप्पा पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाचे पंचायत समितीचे उमेदवार ज्ञानेश्वर श्रीहरी खडबडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे शिवसेना ठाकरे गट पक्षाचे जिल्हा संघटक अवधूत पाटील शिराढोण युवासेना शहरप्रमुख रमेश माळी युवासेना उपशहर प्रमुख अक्षय सहाने महेश सहाने किरण खडबडे सुरज सुरज कड निष्ठावंत शिवसैनिक विनोद नानजकर राजाभाऊ वाघमारे यांच्या समावेत बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा