*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा येथील न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सदाशिव जाधव यांच्या पत्नी
सौ. स्वाती सदाशिव जाधव, यांनी सोलापूर येथील विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली आहे त्या सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव, ता. जि. अहिल्यानगर येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक व शैक्षणिक समस्यांचा अभ्यास* या संशोधन विषयाकरिता पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली.
विवाह झाल्यानंतर त्यांनी डी. एड्. केले. प्राथमिक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर आपले शिक्षण न थांबता जिद्द, मेहनत आणि चिकाटीने ते सुरू ठेवत बी.ए. (इंग्रजी), एम.ए. (इतिहास), एम.ए. (शिक्षणशास्त्र), बी. एड्., डी.एस.एम. तसेच शिक्षणशास्त्र विषयांमधून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबर स्वतःची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उंचावत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ , विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर लकडे, प्रा. डॉ. आयेशा रंगरेज मॅडम, प्रा. डॉ. माहेश्वर कळलावे , प्रा. डॉ. विद्युलता पांढरे मॅडम, प्रा. डॉ. शीला स्वामी मॅडम, प्रा. डॉ. नदाफ मॅडम, प्रा. डॉ. वीरभद्र दंडे, प्रा. डॉ. जी. डी. बिराजदार, प्रा. डॉ. मेहेरजबीन वडवान आदींनी सौ. स्वाती सदाशिव जाधव यांचे अभिनंदन केले.
पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून, शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे. तसेच अहिल्यानगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच विधिज्ञ विनोद गायकवाड, अतिरिक्त स्थायी सल्लागार, भारत सरकार यांनी अभिनंदन केले आहे.
पीएचडी पदवी प्राप्त स्वाती जाधव यांनी अथक परिश्रम व मेहनत घेऊन सदरची पदवी प्राप्त केल्याने त्यांचे विशेषता सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा