Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

*डाॅ.कश्मिरा यांच्या आरोग्य शिबिरास महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला.*

 *अकलूज --प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील डाॅ.कश्मिरा यांच्या क्लिनिकच्या वतीने महिलांसाठी डेंटल,स्किन व हेअर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला महिलांसह युवक व युवती यांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महिलांच्या विविध समस्यांवर निरसन करण्यात आले.या शिबिरात १०० जणांची मोफत तपासणी करण्यात आली



            भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून डाॅ.कश्मिरा लोहकरे (रत्नपारखी) यांनी सर्वांसाठी मोफत डेंटल,स्किन व हेअर तपासणीचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात डाॅ.कश्मिरा यांनी केसाची निगा,त्वचेची व दातांची काळजी कशी घ्यावयाची व त्यावरील उपचार यावर सर्वांना मार्गदर्शन केले.

         यावेळी मार्गदर्शन डॉ कश्मिरा यांनी सांगितले की, दंतोपचाराविषयी रुग्णांना मनात भीती व बरेच गैरसमज असतात त्याविषयी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच केस व त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यावी या बाबत सल्ला दिला.लग्न समारंभापूर्वी वधू व वर यांनी त्वचेची निगा कशी घ्यावी. त्याविषयी सल्ला दिला.या शिबिरामध्ये लहान मुलांचे तज्ञ डॉ.अनुजा ढेंबरे-पाटील यांनी लहान मुलांच्या पालकांना अचूक मार्गदर्शन केले




              यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या नूतन सौ.प्रतिभा गायकवाड,सौ.अश्विनी लावंड,सौ.रूपाली खरात,सौ. राजश्री काटे,सौ.बालिका धांडोरे, सौ.मयूरी लोंढे,सौ.अंजिता लोंढे, विलासानंद गायकवाड,भारत लावंड आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा