Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

प्राथमिक शाळा क्रमांक 3 माळीनगर-गट नंबर 2 येथे बाल आनंदी मेळावा आणि हळदीकुंकू कार्यक्रम आनंदात साजरा

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल मांडून वस्तू विक्रीचा आनंद घेत व्यवहारज्ञान शिकले.यामध्ये भाजीपाला, फळभाज्या, स्टेशनरी,फळे,थंड पेय,खाण्याचे पदार्थ इत्यादी वस्तू होत्या.


         यामध्ये दि.सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. रंजन भाऊ गिरमे, संस्थेचे सेक्रेटरी अजय गिरमे साहेब आणि सर्व संचालक मंडळ तसेच पालक,ग्रामस्थ यांनी या उपक्रमामध्ये विद्यार्थ्याकडून बाजार घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. श्रीपुर- महाळुंग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्हाण तसेच नगरसेविका सौ. ज्योस्ना सावंत पाटील सौ.कल्पना काटे उपस्थित होत्या.त्याचबरोबर शाळेच्या महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये सर्व माता-भगिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला.    



  .अशाप्रकारे दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा क्रमांक 3 माळीनगर- गट नंबर 2 आनंदीमय वातावरणात हळदी कुंकू कार्यक्रम व बाल आनंदी बाजार (मार्केट डे) आनंदी वातावरणामध्ये पार पडला.कार्यक्रमाचे मनोगत शाळेच्या कार्यतत्पर आदर्श मुख्याध्यापिका सौ.ललिता नागटिळक मॅडम यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.वंदना बंडगर मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ.उज्वला देवकाते मॅडम,श्री वैजिनाथ भोसले सर,श्री. गोविंदा काळे सर, श्रीम.स्मिता म्हेत्रे मॅडम,सौ.गौरी शिंदे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार श्री.प्रवीण खरात सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा