*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट ) कार्यकर्ता मेळावा आज दिनांक 12 जानेवारी रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये एड.अजित विघ्ने,एड नितीन राजेभोसले, अण्णासाहेब पवार, सुजित तात्या बागल, रोहिदास सातव, दत्तात्रय अडसूळ दादासाहेब जाधव, विनय ननवरे, रवींद्र वळेकर या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार ) गटाने संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढवावी असा नारा दिला. कुर्डूवाडी नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश संपादन केलं तसेच यश मतदारांच्या विश्वासाच्या बळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत निश्चितच मिळेल असा ठाम विश्वास या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी व्यासपीठावर सुभाष आबा गुळवे, तात्यासाहेब मस्कर ,चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, नवनाथ भांगे, एड. गिरंजे, विलास दादा पाटील, तानाजी झोळ,विलास राऊत ,अशोक पाटील विवेक येवले,पोपट सरडे, निळकंठ अभंग ,तात्यासाहेब जाधव ,चंद्रहास निमगिरे, सुहास रोकडे ,नानासाहेब निळ, उद्धव दादा माळी, एड. अजित विघ्ने, सुजित बागल, नानासाहेब लोकरे, नानासाहेब मोरे, प्रकाश थोरात, तात्या मामा सरडे, राजेंद्र धांडे ,डॉ. गोरख गुळवे, राजेंद्र बाबर, विनय ननवरे, आर.आर. बापू साखरे, अभिजीत पाटील, शंकर जाधव, सुदाम शेळके, अण्णासाहेब पवार, सुहास आबा साळुंखे, दत्तात्रय अडसूळ, राजाभाऊ देशमुख, सोमनाथ रोकडे, संदीप तळेकर, बाळासाहेब ढेरे ,मयूर पाटील, गौरव झांजुर्णे, गणेश गुंडगिरे, बाळासाहेब पाटील, उमेश इंगळे, महेश गंणगे, अनिल शेजाळ, रवींद्र वळेकर, अशोक तकिक, प्रमोद बदे, रोहिदास सातव, विकास गोंदकर, युवराज गपाट, राहुल कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट -
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःची लायकी तपासावी - संजयमामा शिंदे.
ज्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. ज्यांनी केवळ खंडणी आणि हप्ते मिळत नाहीत म्हणून तहसीलदारांवरती हक्कभंग आणला. कंत्राटदार टक्केवारी देत नाही म्हणून ज्यांनी दहिगाव चे पाईप जाळून काम बंद पाडण्याचे पाप केले असे लोक आज माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत त्यांची ती लायकी नाही असी सणसणीत चपराक शिंदे यांनी विरोधकांना लगावली. मी विकास कामे करणारा कार्यकर्ता आहे.जातीचे आणि नात्यागोत्याचं राजकारण मी कधीच केलं नाही आणि करणारही नाही. माझ्या विकास कामाची भीती घेऊनच सर्व विरोधक एकत्र येऊन माझा गट तालुक्यातून संपवण्यात चे स्वप्न पाहत आहेत. दोन निवडणुकांमध्ये पराभव होऊनही एक कार्यकर्ता सुद्धा आपल्यापासून हललेला नाही हे नैतिक बळ असल्यामुळेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदार आपल्याला निश्चितच कौल देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विधानसभेनंतर झालेल्या आदिनाथ कारखाना निवडणुकीत सभासदांनी 12 पैकी 5 गणांमध्ये आपल्याला लीड दिला. जवळपास 45 टक्के मतदान सभासदांनी दिलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
चौकट -
कारखाना सुरू करण्याची पात्रता नारायण पाटलांकडे नाही - सुभाष गुळवे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी नारायण पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की,त्यांच्याकडे कारखाना सुरू करण्याची पात्रता नाही .सभासदांनी मोठ्या विश्वासाने कारखान्याची सत्ता आमदाराकडे दिलेली आहे परंतु या आमदाराचा, चेअरमन चा स्वतःचा ऊस पवारांच्या साखर कारखान्याला जात आहे. यांच्याकडून सोन्याचा धूर तर निघणार नाहीच परंतु सभासद शेतकरी बांधवांच्या स्वप्नांची राख रांगोळी मात्र निश्चितच होणार आहे. येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर हा कारखाना निश्चितच निलावात निघेल कारण तो कारखाना वाचवण्यासाठी आवश्यक असलेली ताकद आणि कुवत या आमदाराकडे नाही. त्यामुळे यापूर्वी केलेली चूक मतदारांनी पुन्हा न करता संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा