*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
---
करमाळा, -सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील दोनशे मीटर धावणे स्पर्धेत तालुक्यातील देवळाली जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा विद्यार्थी प्रज्वल गोसावी याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
माढा येथे या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. गोसावी याने धावणे मुले लहान गट प्रकारात यश मिळविले. त्याला वर्गशिक्षिका वर्षा डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी अमित कदम, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, विस्ताराधिकारी मिनिनाथ टकले, केंद्रप्रमुख राजकुमार खाडे, सरपंच पोपट बोराडे, मुख्याध्यापक बहिरू गभाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा