*अकलूज--- प्रतिनिधी*
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने शिवतीर्थ आखाङा शंकरनगर येथे दिनांक १२ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या ४७ व्या अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी चषक कुस्ती स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील,अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक व स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.यावेळी समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील,मल्ल सम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर,संचालक रामचंद्र ठवरे,गोविंद पवार,विराज निंबाळकर,दत्ता मगर, वसंतराव जाधव,पोपट भोसले पाटील,बिभीषण जाधव,अनिल काटे यांच्यासह विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी,कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्पर्धेचा प्रारंभ उपस्थितांच्या हस्ते ओम शिंदे नातेपुते विरुद्ध युवराज माने खुडूस व सौरभ मिश्किल बेंबळे व स्वप्नील भोसले टेंभुर्णी या मल्लांची स्पर्धा लावून झाला.यामध्ये शिंदे व मिश्किल विजेते झाले.राम सारंग व त्यांचे पंच स्पर्धेसाठी कार्यरत आहेत.
यावेळी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले,सहकार महर्षींनी सुरू केलेल्या या कुस्ती स्पर्धेला ४७ वर्षे झाली असून या मातीतून अनेक महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत.देश पातळीवर लौकिक असणारे हे मैदान आहे.अखिल भारतीय त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेसाठी ८०, तर वजनी २५ ते ८५ पर्यंतच्या गटा करीता ६०३ मल्लांनी सहभाग घेतला आहे. उपस्थितांचे स्वागत वसंतराव जाधव यांनी केले. सूत्रसंचालन युवराज केचे यांनी केले.
*चौकट..*
अशी आहेत स्पर्धेसाठीची बक्षिसे..
ञिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटाकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये,द्वितीय क्रमांकासाठी दिङ लाख रुपये,तृतिय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहे तर वजनी गटानुसार विजेत्या व पराजित मल्लांनाही भव्य बक्षीस आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा