*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण येथील के. एन. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेला “खरी कमाई” हा अभिनव उपक्रम सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता, प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणाऱ्या कौशल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीतून लघुउद्योग, हस्तकला, सेवा उपक्रम आदींच्या माध्यमातून कमाईचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मेहनत, शिस्त, नियोजन, व्यवहारज्ञान आणि आत्मविश्वास यांचा अनोखा संगम या उपक्रमात पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक, तर पालक व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. “खरी कमाई म्हणजे केवळ पैशांची नाही, तर अनुभव, कष्ट आणि आत्मसन्मानाची,” हे मूल्य या उपक्रमातून विद्यार्थ्यांवर ठसवण्यात शाळेला यश आले आहे
अशा उपक्रमांमुळे के. एन. हायस्कूल शिराढोण हे केवळ शिक्षण देणारे नव्हे, तर घडवणारे शैक्षणिक केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. यावेळी खरी कमाई चा उद्घाटन प्रशासकीय अधिकारी मुक्तार शेख प्राचार्य गुणवंत घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य राजेश्वर पाटील साळुंखे सर अकबर सर चंद्रकांत महाजन सर मुख्याध्यापिका सुरय्या डांगे समुद्रे सर आर एम सर खमरसर पूजा मॅडम तहुराबाजी फरहतबाजी शाफियाबाजी नाडे सर आदी सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवली या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी चार चार हजार ची कमाई केली कार्यक्रम अत्यंत यशस्वी पार पडला आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा