*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील आवाटी गावचे सुपुत्र तसेच करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक रफिक खलील खान यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर येथे त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला सदरचा गौरव शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्हा यांच्यावतीने करण्यात आला
मूळचे आवाटी येथील सुपुत्र असणारे व करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालय मध्ये कला शिक्षक म्हणून कार्य करणारे रफिक खान यांना त्यांच्या उल्लेखनीय तसेच उत्कृष्ट कार्य प्रणाली बद्दल त्यांना शिक्षक भरती सोलापूर जिल्हा या संघटनेने जिल्हास्तरीय सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार 2026 कला व क्रीडा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्याचा यथोचित गौरव करण्यात आला सदरचा पुरस्कार हा शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता याचवेळी विविध शिक्षकांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला
त्यांना मिळालेल्या या गुणगौरव पुरस्कार बद्दल त्यांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, प्राचार्य जिया खान, आवाटी येथील वली बाबा दर्गाहाचे खादीम नबी खान कादरी तसेच इरफान कादरी या शिवाय बार्शी चे माजी नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी आवाटी येथील माजी सरपंच साबीर खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान ,पत्रकार अलीम शेख यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये एक उत्कृष्ट कलाशिक्षक म्हणून रफिक खान सर यांची ओळख आहे त्यांनी त्यांच्या केलेल्या शिक्षकी पेशा मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल त्याचा हा सन्मान सोलापूर जिल्हा शिक्षक भरती संघटनेने केला आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा