Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

*उद्धव -फडणवीस चर्चा? मुंबईत महापौरपदासाठी ठाकरे गट भाजपच्या पाठिशी, शिंदेंना शह देण्याची खेळी*

 *संपादक -*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


मुंबई : मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरु झाल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचे कळते. या शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्याला उत्तर म्हणून असे पाऊल उचलले जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. मुंबईत भाजप तसेच शिंदे यांच्या पक्षाला ११८ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. भाजपकडे ८९ सदस्य आहेत. आकड्यांच्या गणितात शिंदे यांच्या २९ नगरसेवकांना महत्त्व आले. त्यातच शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. कल्याण-डोंबिवलीतील घडामोडींमुळे नाराज झालेल्या उद्धव यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदतीची खेळी केल्याचे सांगितले जाते.

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढवून देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी स्पर्धा सुरु झाली आहे. याठिकाणी ५४ लागा लढवून भाजपने ५१ जागांवर विजय मिळविला. तर शिंदे सेनेने येथे ६८ जागा लढवून ५४ जागांवर यश मिळवले. येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेत बहुमतासाठी ६३ जागांची आवश्यकता असून महापौरपदाचे गणित जमविण्यासाठी शिंदे यांचे पुत्र डाॅ.श्रीकांत यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

मुंबईत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या १२ नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त असून, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर पडद्यामागील हालचालींना वेग आला.

शिंदेंना ना स्थायी ना बेस्ट समिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात पक्षश्रेष्टीपुढे स्पष्ट भूमिका घेतली असून, शिंदे गटास महापौरपद, स्थायी समिती वा 'बेस्ट' यातील काही देण्यास विरोध दर्शवला आहे. शिंदे यांच्या पाठिंब्याशिवायही मुंबई महापालिकेत भाजप सर्व राजकीय आव्हानांस तोंड देऊ शकतो हे स्पष्ट व्हावे यासाठीच उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्यामागे समटाची बातचीत सुरु असल्याचे कळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा