*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व नागरिकांसाठी सर्वरोग निदान व फिजिओथेरपी आरोग्य शिबिर आज नगरसेविका सौ. रूपाली सुनील आंबेकर,नोहिद शेख तसेच समस्त समता परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरास प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे, मोफत उपचार, फिजिओथेरपी उपचार तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा सुमारे ३५० नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला.
या प्रसंगी गटनेते श्री. खलिफा कुरेशी, नगरसेवक व शहराध्यक्ष बबलूभाई शेख, शेखर घोडके (युवक जिल्हाध्यक्ष), डॉ. अविनाश तांबारे, मनीषाताई पाटील, जिजाऊ जन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षा अनिताताई पाटील, माजी नगरसेविका साळुंखेताई, सुनिल अंबेकर डॉ. पूजा मॅडम, युवक तालुकाध्यक्ष अमर गुंड, नगरसेवक नरसिंह मिटकरी, तेजस देवकते, नगरसेवक सर्फराज कुरेशी, युवक शहराध्यक्ष रणवीरजी इंगळे, पंकज नाना भोसले,नोहिद शेख, डॉ. वाकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा