*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्राध्यापक तुषार बिभीषण वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कळंब तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाभळगाव गावच्या या भूमिपुत्राच्या निवडीने तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राध्यापक वाघमारे हे अभ्यासू, संयमी व सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी, युवक, शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत, आगामी काळात कळंब तालुक्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी व संघटन वाढीसाठी प्रा. वाघमारे यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
निवडीनंतर दहिफळसह कळंब तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकप्रिय जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रीधर भवर सर आतिश वाघमारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा