*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख पैलवान सुधाकर लावंड यांचे चिरंजीव सिद्धेश लावंड यांचा नुकताच करमाळा नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा करमाळा अर्बन बँकेने त्यांचा बँकेच्या सभागृहामध्ये सत्कार केला मकर संक्रांति निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सदर सत्काराचा कार्यक्रम पार पडला
सदरचा सत्कार समारंभ बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्या उपस्थितीमध्ये बँकेचे संचालक जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला याचवेळी नगरपालिकेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अतुल फंड यांचा देखील बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर बँकेचे संचालक कलीम काझी, चुंबळकर, करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण बोकन, भाजपाचे युवा नेते सुहास घोलप आदी मान्यवरांच्या उपस्थित मध्ये सदरचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करमाळा अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले याचवेळी पत्रकार दिनानिमित्त करमाळा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा करमाळा अर्बन बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा